निवडणुकांनंतर राज-उद्धव एकत्र येतील- नाना पाटेकर

nana
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राजकारणात जे वारे वाहत आहेत त्यावरून निवडणुकांनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येतील अशी खात्री असल्याचे अभिनेता नाना पाटेकर याने एका खासगी दूरवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

नाना म्हणाला की या दोघा भावांनी एकत्र यावे अशी माझी प्रथमपासूनच इच्छा होती मात्र ती पुरी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. अलिकडे राज्यातील राजकीय परिस्थिती अचानक बदलली आहे आणि पक्षीय समीकरणेही बदलली आहेत. उद्धव आणि राज दोघेही ही परिस्थिती उत्तम समजू शकतात व त्यामुळेच निवडणुकांनंतर हे दोघे एकत्र येतील याची मला १०० टक्के नव्हे तर ३०० टक्के खात्री आहे.

नाना म्हणाला मी राजकारणात जाणार नाही कारण माझा तो प्रांत नाही. मात्र राज्यसभेवर जाण्याची संधी मिळांली तर संसदेत जाणे मला नक्कीच आवडेल.