दिल्लीच्या शहापुढे झुकणार नाही, महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी लढाई !

uddhav
अहमदनगर – महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठीची लढाई शिवसेना लढत आहे. दिल्लीमध्ये शहेंशहा असो प्रतिपादन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी गांधी मैदान येथे आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. उध्दव ठाकरे यांनी भाषणात भाजपाच्या राज्यातील नेत्यांवर जोरदार टीका केली. याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, २५ वर्षांनंतर शिवसेना एकटी लढाई करीत आहे, असे असले तरी राज्यातील जनता सोबत असल्याने शिवसेनेची लढाई एकट्याटी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचा उपयोग करून घेतला.

मात्र राज्यात अनुकुल वातावरण असतांना भाजपाने २५ वर्षांची युती तोडली. भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नाते का तोडले हे अद्यापही लक्षात येत नाही. केंद्रातले मंत्री, वेगवगळ्या राज्यातले मंत्री महाराष्ट्रात येऊन विरोधी प्रचार करीत असल्याने अफझल खाना सारख संकट येतय असे म्हटले तर त्यात काही चूक केली असे वाटत नाही, असे सांगून उध्दव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे पुरते वस्त्रहरण केले आहे. त्यांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. व्हिजन डॉक्युमेंट, ८ वी पासूनच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट देणार, शेतक-यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणि विजेशिवाय कृषी उपकरणे चालतील असे तंत्रज्ञान आगामी काळात उपलब्ध करून देणार असल्याचे ठाकरे यांनी भाषाणात सांगितले.