
नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २५ वर्षांची युती तुटल्याचे खापर शिवसेनेकडून वारंवार भाजपवर फोडले जात आहे. यावर अखेर आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपली खरी लढाई कोणाशी आहे. आघाडी सरकारशी की भाजपशी, याचा शिवसेनेने विचार करण्याची वेळ आली आहे, असे फडणवीस म्हणाले. विधानसभा निडणुकीच्या तोंडावर २५ वर्षांची युती भाजपने तोडली. याची घोषणा भाजपने केली. मात्र आम्हाला अपेक्षित जागा न मिळाल्याने मित्रपक्षांना खूश ठेवता येणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाजपने युती तोडली असल्याचे सांगितले. शिवाजी महाराज कोणाची खाजगी मालमत्ता नसल्याचे सांगत शिवसेनेने भाजपचा समाचार घेण्यास सुरुवात केली. मात्र २५ वर्षे खंडणी घेणाऱ्यांबरोबर कशी काय युती केली. आम्ही कोणाच्या नावावर खंडणी घेतलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुम्ही कधी शिवजयंती साजरी केली का, असा थेट सवाल केला.
