सीबीआय करणार टेबल टेनिसपटूंची चौकशी

cbi
नवी दिल्ली – भारतात राष्ट्रीय स्तरावर अनेक टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यात सहभागी होणारे स्पर्धेक बहुधा वयाचा बनावट दाखल देतात, याचे मात्र दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. त्यामुळे आता याप्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. काही स्पर्धकांनी खोटे वय दाखवल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलीला स्पर्धेतून वगळण्यात आले. त्यामुळे संबंधिक अधिकाऱ्यांनी क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधून खेळाडूंच्या वयाची चौकशी करण्यासाठी विनंती केली. त्यामुळे आता पश्चिम बंगालमधील टेबल टेनिसपटूंची चौकशी केली जाणार आहे. याबाबत सांगताना सीबीआयच्या एका अधिकाऱ्यांने म्हटले की, सरकारकडून विविध सुविधा मिळविण्यासाठी बऱ्याचवेळा खेळाडूंच्या वयाममध्ये फेरफार केला जातो, असे आढळून आल्याने हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अशा स्पर्धांची नोंद करून त्याची सविस्तर माहिती पाठविण्याचा आदेश सीबीआयने अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनला दिला आहे.

पश्चिम बंगाल टेबल टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष बिस्वजीत मुखर्जी यांनी सांगितले की, सीबीआयच्या या विभागाने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि काही कागदपत्रांची मागणी केली होती. ती सगळी माहिती लवकरच त्यांना दिली जाईल. असोसिएशनमधील जवळपास ४० खेळाडूंना या विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्याअंतर्गत हे खेळाडू ज्या स्पर्धांमध्ये खेळले आहेत शिवाय ज्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत, त्यांची माहिती मागविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.