काँग्रेसने पडला आश्वासनाचा पाऊस

congress
मुंबई : काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा आज प्रसिध्द करण्यात आला असून, यामध्ये आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबईतील सर्व टोलनाके रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार शिंदे यांच्याहस्ते हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. नववी पास विद्यार्थांना मोफत टॅबलेट फोन, आगामी पाच वर्षांत म्हाडाची एक लाख घरे बांधणे, ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० करणे, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन १ हजार करणे, महिलांसाठी विशेष पोलीस चौक्यांची स्थापना करने, पुणे आणि नागपूरमध्ये आयआयटीची स्थापना, प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडणे, सर्व महाविद्यालयात मोफत वाय-फाय सुविधा ही आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.