
मुंबई – स्वबळावर लढण्यास सज्ज झालेल्या शिवसेनेच्या मुंबईतील एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
शिवसेना उमेदवाराचा अर्ज बाद
शिवसेनेच्या राजूल पटेल या महिला उमेदवाराने वर्सोवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण तांत्रिक कारणांमुळे राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. या उमेदवारी अर्जासंदर्भात पटेल मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप न घेता न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचे म्हटले आहे.
