त्र्यंबक भिसेंना लागली लॉटरी

congress
लातूर : शेवटच्या क्षणापर्यंत लातूर काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत सुरु असलेल्या गोंधळाचा फटका धीरज देशमुखांना बसला आहे. विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र धीरज यांना एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागली आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते पण संभ्रमामुळे अखेर त्र्यंबक भिसेंनीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

खर तर यापूर्वी त्र्यंबक भिसेंना डावलत पक्षाने धीरज देशमुखांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. मात्र देशमुखांना एबी फॉर्म न मिळणे भिसेंच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रचार शुभारंभाच्या सभेतही संयोजकांनी धीरज देशमुख यांचे लातूर ग्रामीणचे उमेदवार अशाच्या शब्दात स्वागत केले होते. धीरज देशमुख ग्रामीणचे उमेदवार या चर्चेने चांगलाच जोर पकडला होता. पण ऐनवेळी झालेल्या गोंधळाने धीरज देशमुख यांचा पत्ता कटला आणि त्र्यंबक भिसे यांची लॉटरी लागली असे म्हणावे लागले.