
न्यूयॉर्क – सुमारे ९ वर्षांच्या व्हिसा बंदी नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून अमेरिकेच्या पहिल्यावहिल्या वारीवर रवाना झालेल्या नरेंद्र मोदी याना न्यूयार्क फेडरल कोर्टाने समन्स बजावले आहे. मोदी अमेरिका वारीवर निघण्याच्या थोडाच काळ अगोदर हे समन्स बजावले गेले असून त्याचे उत्तर देण्यासाठी मोदींना २१ दिवसांची मुदत असल्याचे समजते.
गुजराथ दंगल – मोदींना न्यूयॉर्क फेडरल कोर्टाचे समन्स
अमेरिकन जस्टीस सेंटरने गुजराथमध्ये २००२ मध्ये झालेल्या भीषण दंगलीप्रकरणात मोदींना जबाबदार धरून त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याला अनुसरून न्यूयार्कच्या फेडरल कोर्टाने हे समन्स जारी केले असल्याचे समजते.
