
इंचेऑन – दुस-या दिवशीही भारतीय नेमबाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात कास्यंपदक पटकावले. भारताने १७४३ गुणांसह तिसरे स्थान मिळवले तर १७४४ गुणांसह दक्षिण कोरियाने स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे पदक
जितू रायने सांघिक प्रकारात ५८५ गुण मिळवले, तर समरेश जंग आणि प्रकाश नांजप्पा यांनी अनुक्रमे ५८० आणि ५७८ गुण मिळवले.
याआधी पहिला दिवस जितू राय आणि श्वेता चौधरी या नेमबाजांनी गाजवला होता. जितू रायने सुवर्णपदका तर श्वेताने कांस्यपदक मिळवले होते.
