
इस्लामाबाद – भारताकडून संपूर्ण काश्मिर घेतल्याशिवाय राहाणार नसल्याचे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावर भुट्टो – झरदारीने पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले आहे. ते म्हणाले, ‘काश्मिर हा पाकिस्तानचा अविभाज्य घटक असून आम्ही आमची एक इंच जमीन देखील सोडणार नाही.’
बिलावल यांनी अळवला काश्मिर राग
पीपल्स पार्टी कार्यकर्त्यांचा मेळावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बिलावल यांनी काश्मिर राग अळवला.
पाकिस्तानच्या दिवंगत माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांचे बिलावल हे चिरंजीव आहेत. अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांचे काश्मीरवरील वक्तव्य, हे त्यांच्या पुनरागमनाचे चिन्ह मानले जात आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी पाकिस्तानमध्ये २०१८ मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत आई बेनझिर यांच्या परंपरागत राटेरोडा मतदारसंघातून निडणूक लढण्याची घोषणा केली होती.
