अलिबाबाची भारत प्रवेशासाठी स्नॅपडीलशी बोलणी

alibaba
चिनी ई कॉमर्स जायंट अलिबाबा कंपनीने भारतात प्रवेशासाठी ऑनलाईन रिटेलर स्नॅपडीलशी बोलणी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यूएस मार्केटमध्ये अलिबाबा जगातील सर्वात मोठी इनिशिअर पब्लीक ऑफर सादर करत आहे. कंपनीची भारतीय बाजारातही उतरण्याची मनिषा आहे आणि त्यासाठी स्नॅपडीलबरोबर बोलणी केली गेली आहे. मात्र याबाबत कोणतीही जादा माहिती मिळू शकलेली नाही.

टाटा ग्रूपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची स्नॅपडील मध्ये शेअर्सस्वरूपात मोठी गुंतवणूक आहे. जपानच्या बड्या ईकॉमर्स कंपनी राकुतेन इंक आणि टेलिकम्युनिकेशन फर्म सॉफटबँक कॉर्पही स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र अलिबाबामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांनी यूएस मधील इनिशिअल पब्लिक ऑफरसाठी आपला दर ६६ वरून ६८ वर नुकताच नेला आहे असेही समजते. या कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी असल्याचे सांगितले जात आहे.