
इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावाच्या हद्दीत एका माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून गावात या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान सुमारे २०० तरुणांनी मुंडणही केले आणि एवढेच नाही तर या माकडाच्या तेराव्याचे जेवणही करण्यात आले.
अंत्यविधी माकडाचे, मुंडण 200 जणांचे
२ सप्टेंबरला इंदूरपासून जवळच असलेल्या दकाचया गावात माकड आणि माकडीण गावात आले. काही कुत्र्यांनी या माकडांना खिजवले. याचदरम्यान माकड पाण्याने भरलेल्या मोठय़ा खड्डय़ात पडले आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
वानर हा भगवान हनुमानाचा अवतार मानला जातो. त्याचा मृत्यू अशुभ मानला जातो. त्याचमुळे गावकऱ्यांनी या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करायचे ठरवले.
३ सप्टेंबरला माकडाला पाण्यातून बाहेर काढण्यात आल. केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या खेड्यातीलही सहा हजार लोकांच्या उपस्थितीत या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. एवढंच नव्हे तर चक्क तरुणांनी मुंडण केले. यानंतर गाववर्गणीतून मागील रविवारी तेराव्याचा कार्यक्रमही पार पडला.
