
औरंगाबाद – प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तलाठी हे आपल्या जागेवर मिळत नाही अशी ओरड आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असते पण आता अशी ओरड यापुढे होण्याची शक्यता कमी आहे. कारण सप्टेंबरपासून तलाठ्यांना ड्यूटीच्या गावातून सेल्फी (मोबाइलमधील स्वत:चे छायाचित्र) काढून ती उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून हजेरी लावावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना तलाठी हजेरी अॅप देण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर १९ तलाठ्यांनी अशी हजेरी नोंदवली.
तलाठ्यांना द्यावी लागणार “सेल्फी’ने हजेरीचा पुरावा
तलाठ्यांनी अँड्रॉइड मोबाइल घेणे बंधनकारक असून औरंगाबादमधील ३८९ तलाठ्यांपैकी पहिल्या दिवशी २५, तर दुसऱ्या दिवशी १९ तलाठ्यांनी अशी हजेरी लावली. पुढील महिन्यात सेल्फीद्वारे हजेरी नसेल तर पगार होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. हे अॅप रेंज नसताही सक्रिय होणार आहे.
