
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी हाजी अराफत शेख यांनी पक्षपातीपणाचा आरोप करीत मनसेला सोडचिट्ठी दिली आहे.
वाहतूक सेनेचे अध्यक्ष शेख यांची मनसेला सोडचिट्ठी
राज ठाकरे यांचे जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून हाजी शेख यांची ओळख असून ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर शेख यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली होती.
राज ठाकरे यांनी वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर वाहतूक सेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे शेख यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर मनसेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करून शेख यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. शेख शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
