
मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी राज्यसरकारच्या जाहिरातबाजीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या जाहिरातबाजीला खेचले कोर्टात
राज्य सरकारच्या ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या जाहिरातबाजीला माने यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 3 सप्टेंबरला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकार जनतेचा पैसा स्वत:च्या जाहिरातींवर खर्च करत असून आतापर्यंत राज्यसरकारने या जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केल्याचे माने यांनी याचिकेत म्हटले आहे.
