दहशतवाद्यांचा चून चूनके मारेंगेचा अमेरिकेला इशारा

terrorist
बगदाद – इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर कब्जा केला असून अमेरिकेने या भागात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हवाई हल्ले सुरु केले आहेत. या हल्ल्यामध्ये ‘दहशतवाद्यांना लक्ष्य केल्यास अमेरिकेच्या जगभरातील नागरीकांना शोधून शोधून रक्तपात घडवू’, असा इशारा इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात दहशतवाद्यांनी एक चित्रफीत प्रसिद्ध केली असून यात शिरच्छेद केलेल्या एका अमेरिकन नागरिकाचे चित्रीकरण आहे. याद्वारे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दहशतवाद्यांनी अमेरिकेला ‘आम्ही तुमचा रक्तपात घडवू’ असा इशारा दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेची मदत मिळाल्यामुळे कुर्दिश योद्‌ध्यांनी इस्लामिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील काही भाग सोडवण्यात यश मिळवले आहे. दहशतवाद्यांच्या भीतीने या भागामधील हजारो याझीदी आणि ख्रिश्‍चन नागरिकांना घरदार सोडून पलायन करावे लागले आहे.