चीनमध्ये महापूराने घातला हाहा:कार

flood
बिजिंग : मुसळधार पावसामुळे चीनच्या गुझोऊ प्रांतातील अनेक नद्यांना आलेल्या पूरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि या पुरामुळे ११ लोक बेपत्ता झाले आहेत. या पूरात 25 घरे वाहून गेली असून, 42 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा फटका बसलेल्या सुमारे 3 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातल्या गुझोऊ प्रांतात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूरामुळे नानचुआन शहरात 32 घरांचे नुकसान झाले आहे. पूरात अडकलेल्या 360 पैकी 350 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच दोन पादचारी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment