
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धोकादायक थर आणि बालगोविंदावरील बंदीचे आम्ही स्वागत केले आहे, मात्र जल्लोषावरची बंदी सहन केली जाणार नसल्याचे स्षष्ट केले.
धोकादायक थरावरील बंदीचे उद्धव ठाकरेंनी केले स्वागत
उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की बालगोविंदावरची बंदीचे स्वागत करतानाच, दहिहंडी उत्सव मात्र जल्लोषातच साजरा व्हायला हवा आणि उच्च न्यायालयाने धोकादायक थराची दखल घेऊन बालगोविंदावर बंदी आणली, त्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. मात्र त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
