
मुंबई : काँग्रेस विरोधतील नारायण राणे यांचे बंड अखेर थंड पडल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेले राणेंच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे.
राणेंचे बंड पडले थंड
नारायण राणे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कृपाशंकर सिंह यांनी आज भेट घेऊन त्यांची समजूत काढली व त्यांना काही नवीन आश्वासनेही देण्यात आली.
या भेटीनंतर माणिकराव ठाकरे यांच्या मागोमाग राणे यांनी स्वत: देखील पत्रकारांना पक्षासोबतच राहणार असून आपण आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.
राणे उद्यापासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे.
या आधीही दोन वेळा काँग्रेसविरोधात नारायण राणेंनी बंड केले होते. त्या दोन्ही वेळेस देखील त्यांना बंडाळीची गुंडाळावी लागली होती. यावेळी देखील त्यांनी दोन आठवडे नाराजी नाट्य सुरु ठेवले. पण पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नाराजी गंभीर दखल घेत जात नसल्याने ते वेगळा मार्ग निवडतील अशी चर्चा सुरु झाली होती.
