
ढाका- बांगलादेशमधील मुंशीगंज भागातील पद्मा नदीत २५० जणांना घेऊन जाणारी प्रवाशी बोट बुडाली. बोट बुडाल्यामुळे २०० हून अधिक जण बेपत्ता झाले असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने ही बोट बुडाली असण्याचा कयास वर्तविण्यात आहे.
बांगलादेशात प्रवाशी बोट बुडाली; २०० बेपत्ता
या दुर्घटनेतील ४५ प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले असून दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. प्रवाशांना वाचवण्यासाठी तातडीने वेगवान बोटी घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल व अग्निशमन दलाच्या पाणबुडयांची मदत घेण्यात येत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
