
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत महायुतीचे जागावाटप निश्चित होईल, अशी माहिती दिली. आज मुंबईत महायुतीच्या घटकपक्षांची आगामी विधासभा निवडणुका आणि जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.
महायुतीचे 15 ऑगस्टपूर्वीच जागावाटप !
या बैठकीला शिवसेना-भाजपाच्या नेत्यांसह, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते.
जागावाटपावरुन कोणताही महायुतीत कलह नसल्यामुळे आगामी निवडणुकीत राज्यात लोकसभा निकालांची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
