स्वस्त भाज्यांसाठी सरकारची ‘शक्कल’

vegetable
मुंबई : मुंबईकरांसाठी एक गोड बातमी आहे. मुंबईत लवकरच ताज्या आणि स्वस्त भाज्या मिळणार आहेत. त्यासाठी सरकारने नवी शक्कल लढवली आहे.

टॉमेटो ८० रुपये किलो, बटाटे ३० रुपये किलो, कांदे ३५ ते ४० रुपये किलो असे हे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या वाढत चाललेल्या महागाईला आवाक्यात आणण्यासाठी सरकारला नवी शक्कल सुचली आहे. सरकार आता भाजी विक्रेत्यांनाअनुदान देणार असल्यामुळे मुंबईत भरपूर भाजीही येणार आहे आणि ती स्वस्तही मिळणार आहे.

त्यासाठी भाजीवाल्यांना थेट शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करणे आणि ती थेट ग्राहकांना विकणे बंधनकारक आहे. ही अट पूर्ण झाली तर सरकार संबंधित भाजीवाल्याला पन्नास टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर ४० टक्क्यांनी घटतील, असा सरकारचा दावा आहे.

सरकारची भाजी विकण्याची ही नवी आयडिया प्रत्यक्षात आली तर मुंबईच्या आसपासच्या भागातले पावणे दोन लाख शेतकरी या योजनेशी जोडले जाणार आहेत आणि त्यांचा फायदाही होणार आहे.

Leave a Comment