आयातीला आळा ;सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ

gold
नवी दिल्ली : दर महिन्याला सुमारे एक हजार ते तीन हजार किलो सोने भारतात चोरट्यामार्गाने येत असल्याची वस्तुस्थिती उघडकीस आल्याने सोन्याच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

आयातीला आळा घालून परकीय चलन वाचवण्याची सरकारची उपाययोजना यशस्वी होऊन सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली असली तरी यामुळे सोन्याच्या तस्करीत मात्र चारपटीने वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार आणि आरबीआयने सोन्याच्या आयातीला आळा घालण्याचे उपाय तसेच सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे सोन्याच्या तस्करीत यापुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स संस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान तस्करी होणारे सुमारे ४00 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण चारपट अधिक आहे. देशात श्रीलंका आणि चेन्नई या मार्गावर सोन्याची तस्करी सर्वाधिक होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दरमहा १000 ते ३000 किलो सोने चोरट्या मार्गाने भारतात येत आहे. २0१३-१४ आर्थिक वर्षात सोन्याच्या तस्करीची १४८ प्रकरणे उघडकीस आली होती आणि २४५ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते, तर २0१२-१३ आर्थिक वर्षात सोने तस्करीची केवळ ४0 प्रकरणे उघडकीस आली होती . याउलट यंदा जानेवारी ते मे दरम्यान दरमहा ३000 किलोपर्यंत चोरटे सोने भारतात आल्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ४५0 टक्क्यांनी अधिक आहे.

Leave a Comment