
नॉटिंगहम : पहिल्या कसोटी दरम्यान भारतीय संघाने रविंद्र जडेजाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन विरोधात तक्रार दाखल केली असून, अँडरसनवर हा आरोप सिध्द झाल्यास लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
अँडरसनवर कारवाई होणार !
अँडरसनने रविंद्र जडेजा फलंदाजी करीत असताना त्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती. भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनिल देव यांनी अँडरसनची ही कृती खेळ विरोधी असल्याने याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. अँडरसन विरोधातील आरोप सिध्द झाल्यास त्याच्यावर दोन ते चार कसोटी किंवा चार ते आठ एक दिवसीय सामन्यांवर बंदीची कारवाई होऊ शकते.
