
मुलाहाऊस – टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीतील गेरार्डमर ते मुलहाऊस असा १७० किलोमीटर्स अंतराचा हा नववा टप्पा वर्ल्ड टाईम ट्रायल चॅम्पियन टोनी मार्टिनने जिंकला. फ्रान्सच्या टोनी गॅलेपिनने आता सर्वंकष आघाडी यलो जर्सी मिळविली आहे.
नवव्या टप्प्यात जर्मनीचा टोनी मार्टिन विजेता
जर्मनीचा रायडर मार्टिनने ६० किमी टप्प्यावर असताना अलेसांड्रो डी मार्चीला मागे टाकून आगेकूच केली ती अखेरपर्यंत टिकवत हा नववा टप्पा जिंकला. आतापर्यंत झालेल्या नऊ टप्प्यातील त्याचे हे पाचवे जेतेपद होते. गॅलोपिनसह एकूण २० जणांचा समूह त्याच्यानंतर २ मिनिटे ४५ सेकंदानंतर पोहोचला. या टप्प्यात फॅबियन कॅन्सेलारा व ग्रेग व्हान ऍव्हरमाएट यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले. याआधीचा आघाडीवीर व्हिन्सेन्झो निबालीला मागे टाकत गॅलोपिनने पिवळय़ा जर्सीवर कब्जा मिळविला आहे. पोर्तुगालचा तिएगो मचाडो तिसऱया स्थानावर आहे.
