
मुंबई – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पातून आर्थिक हातभार लावला असून जेएनएनयूआरएम अंतर्गत बेस्टला ४२६ नव्या कोर्या करकरीत बसेस तसेच एसी बसेस देखील सरकार देणार आहेत. बेस्टमधील सुत्रांनी सांगितले की या एसी बसेस प्रामुख्याने वांद्रे आणि कुर्ला संकुलाशी निगडीत मार्गावर धावतील.
केंद्र सरकारकडून बेस्टला सरप्राईज गिफ्ट
बेस्टचे सदस्य आकाश पुरोहित यांनी सांगितले की वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी निधीची गरज आहे. बेस्टला या नव्या बसेस लवकरात लवकर मिळाव्या अशी अपेक्षा बेस्ट समितीचे सदस्य शिवजी सिंग यांनी व्यक्त केली आहे.
शहरी वाहतुकीबरोबरच नागरी सुविधांसाठी ५० हजार कोटी निधीची तरतूद केंद्र सरकारने केली असल्यामुळे नागरी सुविधांच्या समस्या मार्गी लागणार आहेत.
