100 फ्रेश स्टोअर्स गुंडाळणार रिलायन्स !

reliance
नवी दिल्ली – देशातील ‘100 रिलायन्स फ्रेश स्टोअर्स गुंडाळण्याचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी घेतला आहे. कंपनीचा फोकस देशातील 450 डॉलर बिलियनच्या होलसेल ‘कॅश अॅण्ड कॅरी’ बिझनेसवर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात रिलायन्स रिटेलचे 550 रिलायन्स फ्रेश स्टोअर्स सुरु आहेत.

रिलायन्सने आपल्या निर्णयाची कर्मचार्‍यांना याबाबत कल्पना दिल्याचे एका वरिष्ठ एक्झिक्युटिव्हने सांगितले. या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेलने आपली बिझनेस धोरणे बदलली आहेत. जी स्टोअर्स तोट्यात सुरु आहेत, अशी स्टोअर्स आधी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी आदित्य बिरला रिटेल आणि स्पेंसर्स रिटेलने आपले स्टोअर्स बंद करण्‍याचा निर्णय घेतला होता. मॉर्डन रिटेलर्ससाठी नाशवंत पदार्थ विक्री करणे तसेच ते स्टोअर करणे फारच जिकरीचे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, वॉलमार्टने 2020 पर्यंत देशात 50 नवे बेस्ट प्राइस स्टोअर्स उघडण्‍याची घोषणा केली आहे. तर रिलायन्सने आगामी दोन वर्षात 100 कॅश अॅण्ड कॅरी स्टोअर्स उघडण्याची तयार केली आहे. यासाठी रिलायन्सला 450 बिलियन डॉलर्स इतका खर्च येणार आहे.