माजी प्रदेश उपाध्यक्षाची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

ncp
मुंबई – राष्ट्रवादी मासिकाच्या संपादिका व पक्षाच्या माजी प्रदेश उपाध्यक्षा, प्रवक्त्या डॉ. भारती लव्हेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी पक्ष हा पुरूषी मानसिकतेतून कार्यरत असल्याचे लव्हेकर यांनी आपले पद सोडतांना म्हटले आहे. तसेच आपण पक्षस्थापनेपासून पक्षासोबत असूनही आपलीही कोंडी होत असल्याचे त्या म्हणतात.

पक्ष सोडतांना या माजी पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. लव्हेकर म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेवेळी आपणास वाटले नव्हते इतकी पुरूषी मानसिकेतेने घेरले आहे.