
द हेग – हॉलंड संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. जर हॉलंडने जेतेपद पटकाविले, तर सर्व फुटबॉलपटूंना अंतराळ सफर घडवण्याची अनोखी ‘ऑफर’ हॉलंडमधील ‘एसएक्ससी’ एरोस्पेस इंजिनियरिंग कंपनीने दिली आहे.
… तर हॉलंड संघाला अंतराळ सफर घडवणार
चार वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेत हॉलंडने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतविजेता स्पेननंतर गतउपविजेता हॉलंडकडे वर्ल्डकप जेतेपदासाठीच्या ‘फेवरिट’मध्ये स्थान मिळाले आहे.
