ज्याला पक्ष सोडायचा, त्याने खुशाल सोडा – छगन भुजबळ

bhujbal
नाशिक – कुणाला कोणत्या पक्षात जायचे असेल तर खुशाल जावे, आम्ही अडविणार नाही असे रोखठोक विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या शिवसेना प्रवेशावर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले जनमत आजमावत असून कौल मिळाला तर येवल्यातूनच लढेन,आपल्याकडे लोकशाही आहे. लाट आहे असे प्रत्येकाला वाटत असल्याने लाटेवर स्वार होण्याची इच्छा ही प्रत्येकाला आहे. त्यामुळेच धुमारे फुटत असल्याने ज्यांना जायचे असेल, त्यांनी खुशाल कुठल्याही पक्षात जावे.

विधानसभा निवडणूक येवल्यातून लढवण्याविषयी भुजबळ म्हणाले की, मला मुंबईहून येथे आणले. कुणीही नातेवाईक येथे नाही, तरीही मला येवलेकरांनी दोनदा विधानसभा निवडणुकीत निवडून पाठवले. आता मी निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात गावोगावी कार्यकर्त्यांमार्फत जनमत आजमावत आहे. जनतेने निवडणूक लढवण्याचा येवल्यातून कौल दिला, तरच मी आगामी विधानसभा निवडणूक लढवीन, असे त्यांनी स्पष्ट केले.