निसर्गाचे चक्र ध्यानात घ्या

clouds
शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारलेला व्यवसाय आहे. तेव्हा या निसर्गाचे व्यवहार अभ्यासल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय नीट करता येणार नाही. केवळ काबाडकष्ट केल्याने शेती पिकत नाही. इंग्रजीत कष्टांना हार्ड वर्क असे म्हणतात. पण केवळ हार्ड वर्क उपयोगी पडत नाही. हार्ट वर्क म्हणजे हृदयापासून काम केले पाहिजे. डोक्याने काम केले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाचे शास्त्र जाणले नाही तर फळ मिळत नाही. शेतीत तसा निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे डोक्याने शेती करावी लागते. निसर्गाचा व्यवहार चक्राच्या नियमाने होत असतो. पावसाचे पाणी पडते. त्याच पाण्याची वाङ्ग होऊन तिचे ढग बनतात. त्या ढगातून पुन्हा पाऊस पडतो. तेच पावसाचे पाणी वाफ होऊन ढगात रूपांतरित होत असते. असे हे पाण्यापासून पाण्यापर्यंतचे चक्र असते.

तीच अवस्था पिकांची असते. शेतीमध्ये आपण एखादे पीक घेतो. ते पीक शेतातल्या मातीचा कस वापरून आपल्याला धान्य देते. ते ज्या मातीतला कस ओढून घेत असते. ते पीक त्या मातीतला त्याने ओढून घेतलेला कस परत करीत असते. प्रत्येक पिकाची ही कस परत करण्याची शक्ती कमी जास्त असते पण ते पीक कृतज्ञ असते. ते मातीला काही ना काही देत असतेच. गव्हाचे पीक जमिनीचा कस ओढून घेते आणि आपल्याला गहू देते पण निघता निघता ते आपले काड या जमिनीला देते. तेच काड पुन्हा खत म्हणून वापरले पाहिजे. हरबरा, तूर, भुईमूग, मूग, उडीद ही पिके तर आपल्या मुळाशी असलेल्या गाठीतून जमिनीला भरपूर नत्र देत असतात. पीक घेणे, त्याने टाकून दिलेेले अवशेष पुन्हा खत म्हणून वापरणे, त्यातून पुन्हा पीक काढणे हे चक्र आहे. सेंद्रीय शेतीत याच चक्राचा वापर केला जात असतो. शेतातली केवळ पिकेच हे चक्र चालवत असतात असे नाही तर कीटक, प्राणी हेही अशाच प्रकारे या चक्रात सहभागी होत असतात. गाय, म्हैस, बैल हे प्राणी शेतात निर्माण झालेला चारा, कडबा किंवा गवत खातात आणि आपले पोट भरतात. हे प्राणी आपले पोट ङ्गुकट भरत नाहीत. ते तो चारा पुन्हा उगवावा यासाठी आवश्यक असलेले शेण आणि मूत्र पुन्हा शेतात टाकतात.

गाय चारा खाते, शेण देते, शेणातून पुन्हा चारा तयार होतो. हे निसर्गाचे चक्र आहे. पक्षीही असाच व्यवहार करीत असतात. आपण कधी शेतात नांगरणी करतो तेव्हा जमिनीतले खालचे मातीचे थर उलथून वर येतात. त्या थरात काही कीडी असतात काही कृमी असतात. त्यांना वेचून खाण्यासाठी बगळे आणि अन्य पक्षी जमा व्हायला लागतात. त्यांना शेतातून हे खाद्य मिळते. पण ते वेचून खाऊन उडून जाताना ते पक्षी शेतात शिटून जातात. आपली विष्ठा ते जमिनीला देतात. त्यांचेही मलमूत्र शेताला खत म्हणून उपयोगी पडत असते. निसर्गाच्या या चक्राचा अनुभव केवळ शेतातच येत असतो असे नाही. आपण आपल्या गाड्या पळवण्यासाठी जे पेट्रोल वापरत असतो ते पेट्रोल किंवा डिझेल हाही अशा एका मोठ्या चक्राचाच भाग आहेे. ङ्गार पूर्वी मानवाचे किंवा सृष्टीचे जे अवशेष पृथ्वीच्या खालच्या थरात दाबले गेले त्यातूनच हे तेल निर्माण झाले आहे. हेही शेतातल्या चक्रासारखेच एक चक्र आहे पण या दोन चक्रातला ङ्गरक आहे.

पेट्रोल तयार होणे ही अनेक वर्षांचीच नव्हे तर अनेक शतकांची प्रकिया आहे. शेतातले चक्र मात्र दरसाल ङ्गिरत असते. ते चक्र कमी वेळेत ङ्गिरून पूर्ण होते. या चक्राचा वापर शेतीत करणे म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रीय शेती होय. शेतात अनेक गोष्टी वाया जात असतात. त्यांचे मोल जाणणे सेंद्रीय शेतीत आवश्यक असते. या वाया जाणार्‍या म्हणजे निसर्गाने ङ्गुकट दिलेल्या घटकांचा आपण जास्तीत जास्त वापर करायला लागलो की आपल्याला बाजारातून ङ्गार काही विकत आणावे लागत नाही. तसे झाले की आपल्या पिकांसाठी होणारा उत्पादन खर्च आपोआप कमी व्हायला लागतो. येथेच शेतीचे अर्थशास्त्र सुधारायला सुरूवात होईल. आपली एका ङ्गार मोठ्या समस्येतून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपण निसर्गाने जे ङ्गुकट दिले आहे त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत आणि चढ्या भावाने बाजारातून रासायनिक खते आणून ‘प्रगतिशील’ शेतकरी व्हायला लागलो आहोत. ही चूक आपल्याला जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले.

Leave a Comment