हर्ले डेव्हीडसनची इलेक्ट्रीक बाईक

harle
हर्ले डेव्हीडसन अल्ट्रा लिमिटेडच्या इलेक्ट्रीक मोटरबाईकच्या टेस्ट ड्राईव्ह बाईक प्रेमी घेऊ लागले असतानाच या नव्या मॉडेलसंबंधी उलटसुलट मतेही व्यकत होऊ लागली आहेत. खर्‍या बाईकप्रेमींना या गाडीचा फटफटफट असा येणारा आवाज इलेक्ट्रीक इंजिनमुळे येत नसल्याचे त्यांना ही मोटरबाईक आवडलेली नाही. तर महिला आणि युवा पिढीला या नव्या गाडीच्या जेटसारख्या येणार्‍या आवाजाची भुरळ पडली असल्याचे दिसून येत आहे. ही इलेक्ट्रीक बाईक गुरूवारी टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१९०३ पासून उत्पादन होत असलेल्या मिलवॉकी येथील कारखान्यात ही बाईक बनली असली तरी तिला एक्स्झॉस्ट पाईपच नसल्याने तिचा सुपरिचित असा आवाजही होत नाही आणि हेच हर्लेच्या प्रेमात असलेल्यांसाठी कांहीसे खुपते आहे. कंपनीचा मालक जॉन शॉल्टर याने मात्र इलेक्ट्रीक बाईक ही काळाची गरज असल्याचे सांगून कंपनीने उचललेले पाऊल अतिशय योग्य असल्याचे समर्थन केले आहे. प्रोजेक्ट लाईव्ह वायर या नावाने या बाईकची माहिती फेसबुकवर दिली गेली आहे व त्याला ४२ हजार लाईक्स आले असल्याचेही सांगितले जात आहे. युवा पिढीकडून गाडीला विशेष पंसती दिली जात आहे. अन्य कंपन्यांनीही इलेक्ट्रीक बाईक सादर केल्या आहेत मात्र हर्ले डेव्हीडसन इतकी चर्चा कोणत्याच बाईकची झालेली नाही. टेस्ट ड्राईव्ह घेतलेल्यांकडून डेटा गोळा केला जाणार आहे व त्यानंतर युरोप आणि कॅनडात पुढच्या वर्षात या इलेक्ट्रीक बाईक विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment