भारतातील ईकॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या

ecommerce
भारतात ई कॉमर्स उद्योगाचे अतिवेगाने वाढ होत चालल्याचे निदर्शनास येत आहे. रिलायन्ससारख्या बड्या उद्योगसमुहाने ई कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. मात्र अगदी छोट्या भांडवलावर सुरू झालेल्या कांही कंपन्यांनी या क्षेत्रात अगोदरच आपली पावले भक्कम केली आहेत. गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा विश्वास मिळविण्यात या कंपन्या अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत.

त्यातील पहिल्या नंबरवर आहे फ्लिपकार्ट. डोंट शॉप फ्लिपकार्ट इट अशा कॅचलाईनने आपली जाहिरात करणारी ही कंपनी देशातील १ नंबरची ईकॉंमर्स कंपनी आहे. सुरवातीला पुस्तके विकणार्‍या या कंपनीने आता मित्रा ही फॅशन अॅपरल कंपनी विकत घेऊन फॅशनबरोबरच फिटनेस, एक्सेसरीज, गॅजेट, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, बेबी केअर, खेळणी या क्षेत्रातही विस्तार केला आहे. रास्त दर व त्वरीत डिलिव्हरी ही यांची वैशिष्ठे आहेत. या कंपनीचे १ कोटी नोंदणीकृत युजर्स आहेत तर दरमहिना १० लाख युनिक युजर्स आहेत असे समजते.

जस्ट डायल ही अशीच दुसरी कंपनी. ऑनलाईन फूड ऑर्डर घेण्यापासून आपल्या व्यवसायाची सुरवात या कंपनीने केली आणि आज तिचे ३.९ कोटी ग्राहक आहेत. सिनेमा तिकीटे, रेस्टॉरंट, बस तिकीट, डॉक्टरांचे नंबर, गिफ्ट शॉप्सची माहिती, रियल इस्टेट कंपन्यांची माहिती अशी अनेक प्रकारची माहिती ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना पुरविते. त्याच्या व्यवसायात १० पटीने वाढ झाली असून कोणत्याही माहितीसाठी ग्राहक जस्ट डायलचेच नाव प्रथम घेतात.

कुणाल बहलने सुरू केलेली स्नॅपडील रेस्टॉरंट डील व्हाऊचर देण्यापासून सुरू झाली ती आज फूटवेअर, ज्वेलरी, स्पोर्टस, किडस, फर्निचर, ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रात पसरली आहे. जबाँगनेही पाहता पाहता व्यवसायात जम बसविला आहे. ऑनलाईन रिटेल विक्री करणारी ही कंपनी फॅशन, लाईफस्टाईल, कस्टमर केअर क्षेत्रात स्थिरावली आहे. २० महिन्यंपेक्षा कमी काळात देशात ३ नंबरवर ही कंपनी पोहोचली असून पाच वर्षांच्या काळात तिने ८ देश आणि २८ शहरात आपले बस्तान बसविले आहे. भारत श्रीलंका, यूएई, ब्रिटन, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड येथे कंपनी कार्यरत आहे. दरमहिना दीड कोटी ग्राहक या साईटवर व्हिजिट करतात असे समजते.

Leave a Comment