केवळ आठ हजारांत नोकियाचा स्मार्टफोन

nokia
मुंबई – मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोनमधील सॅमसंग, एचटीसी आणि चीनच्या मोबाईल फोन्सना टक्कर देण्यासाठी मंगळवारी अँड्रॉईड प्लॅटफार्मवर आधारित नवा एक्स २ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या दोन वर्षात भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेची झपाटय़ाने वाढ झाली आहे. यात अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनचा मोठा वाटा आहे. हा ट्रेंड नोकियानेही मान्य केला असून कंपनीने ‘एक्स’ला अँड्राइड प्लॅटफॉर्मवर विकसित केले आहे.या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९९ युरो म्हणजेच आठ हजार १०० रुपये इतकी असणार आहे.

सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्सची विक्री होत आहे. गेल्या वर्षी ४४ दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. तर ८० टक्के विक्री झालेल्या स्मार्टफोनची किंमत १२ हजाराहून कमी होती. याच धर्तीवर नोकियाने हा नवा फोन लाँच केला आहे.

नोकिया एक्स २ ची वैशिष्ट्ये – » ४.३ इंचाचा डिस्प्ले » १.२ गिगाहर्टझ ड्युअल कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर » ड्युअल सिम » पाच मेगापिक्सेल कॅमेरा » एक जीबी रॅम » चार जीबी इंटरनल मेमरी(३२ जीबीपर्य़ंत वाढवण्याची क्षमता)

Leave a Comment