
मुंबई – मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल ट्रायडेंट समोरील रोडवर गुरवारी मध्यरात्री २३ वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज गाडीने उडवले.त्यात मयुर कदम याचा उपचारादरम्यान बॉम्बे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बिल्डरच्या मुलाने हा अपघात केला असला तरी गाडीसह तो फरार झाला आहे. मयूर हा सिनेमा जगताशी संबंधित असल्याने पोलिस स्थानकाभोवती कलावंतानी गाडीचालकाला पकडण्याबरोबरच तपासाच्या मागणीसाठी गर्दी केली होती.
मुंबईत ‘हिट अॅन्ड रन’;सिनेमा कलावंतांचे पोलिस स्टेशनमध्ये ठाण
मयुर हा घोडपदेव येथील चास्कर चाळीत राहत होता. मोठ्या भावाच्या वाढदिवसासाठी तो भेटवस्तू विकत घेण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट समोरील रोडवर एम एच ४६ ए डी ४६४६ या मर्सिडीज कारने भरधाव वेगाने येत मयूरच्या मोटारसायकलवर आदळली.त्यात मयुर गंभीर जखमी झाला. मयुर हा मराठी सिनेमात सहकलाकार तसेच तृप्ती भोइर प्रॉडक्शन मध्ये काम करत असे. त्यामुळे या अपघातातील आरोपीला अटक व्हावी यासाठी मराठी सिनेमा जगतातील अनेक मंडळींनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले .मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात याबाबत हिट अॅन्ड रन आणि ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल वरधान या नीलम रियल इस्टेट नामक बड्या बिल्डरच्या मुला विरोधात एफआयआर दाखल केली आहे
