हिंसाचारामुळे निर्वासितांचा आकडा पोहचला ५ कोटींवर

jineha
जिनेव्हा – जागतिक निर्वासित दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या अहवालातून जगात हिंसाचारामुळे निर्वासितांचा आकडा पोहचला ५ कोटींवर असल्याची धक्कादायक माहिती चव्हाट्यावर आली आहे .

दुस-या महायुद्धानंतर पहिल्यांदाच युद्ध आणि हिंसाचारामुळे घरदार सोडून निर्वासित झालेल्या लोकांची संख्या पाच कोटींपेक्षा जास्त झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसाठी नेमलेल्या (युएनएचसीआर) संस्थेने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सीरियामधील हिंसाचारामुळे निर्वासितांची संख्या प्रामुख्याने वाढली आहे. सीरियामध्ये मार्च २०११ पर्यंत २५ लाख नागरिकांनी सीरिया सोडून अन्य देशांमध्ये आश्रय घेतला. तरीही तेथील निर्वासितांची संख्या सुमारे ६०.५ लाखावर पोहचली आहे. आफ्रीकन रिपब्लिक, युक्रेन, इराक आणि दक्षिण सुदानमधील हिंसाचारामुळेही विस्थापितांच्या संख्येत वाढ झाली आहे.सर्वाधिक आशिया आणि पॅसिफीक खंडातून साडेतीन कोटी निर्वासित झाले आहेत. उप सहारन आफ्रीकेत दोन कोटी ९० लाख, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रीकेत दोन कोटी ६० लाख निर्वासित आहेत. तर जॉर्डन, लेबनन आणि तुर्कीत एकट्या सिरीयामधील एकूण १५ लाख २४ हजार ९७९ निर्वासित असल्याचे पाहणीत उघड झाले आहे.

Leave a Comment