एसी शौचालयावरील पोस्टरने राज ठाकरे नाराज

raj
मुंबई – काही राजकारणी लोकांना प्रसिद्धीची फार हाव असते. त्यांना असे वाटते की आपले पोस्टर शहराच्या प्रत्येक भागात असावेत, पण असेच काही उलटे घडले आहे राज ठाकरे यांच्याबाबतीत. कांदिवली (पूर्व) मध्ये एक वातानुकूलित शौचालय मनसेतर्फे स्थापित करण्यात आले, पण शौचालयावर मनसे सैनिकांनी चक्क मनसे प्रमुखांचाच फोटो लावला होता, जोकि मनसे प्रमुखांच्या आदेशानंतर त्वरित काढून टाकण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वी आमदार प्रवीण दरेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळेस राज ठाकरे यांनी हे पोस्टर पहिले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की ज्यावेळी लोक या शौचालयात येतील त्यावेळेस त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे. आमदार प्रवीण दरेकर यांच्या आमदारनिधीतून हे शौचालय बांधले गेले असून, दरेकर यांनी मनसैनिकांना त्या पोस्टरवरील राज ठाकरे यांची छायाचित्र त्वरित काढण्यास सांगितले. त्यानुसार मनसैनिकांनी पोस्टर काढून टाकले आहे.