
मुंबई – राज्यात शिक्षणाला अधोगती लागली असून पटसंख्या घसरत असल्याची वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे राज्यात २८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अजूनही प्रतीक्षा आहे,विशेष म्हणजे एकही विद्यार्थी या २८ शाळांमध्ये नाही. हा खुलासा खुद्द शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.
धक्कादायक… राज्यात २८ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही
विधानसभेत बोलताना दर्डा यांनी ही धक्कादायक माहिती दिली.पण एकही शाळा बंद करणार नाही अशी ग्वाहीही दिली.
राज्यातील 12 हजार 789 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या 20 पेक्षा कमी असल्याच्या प्रश्नावर राजेंद्र दर्डांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.त्यांच्या खुलाशानुसार राज्यात तब्बल 28 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. त्याचप्रमाणे एकुण 54 शाळांमध्ये केवळ एकच विद्यार्थी असल्याचे गंभीर बाब उघडकीस आली आहे. पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याच्या कारणावरुन एकही शाळा बंद करणार नसल्याचे आश्वासनही शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे.
