
कळवण – मराठा आरक्षणासाठी आता छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून शुक्रवारपासून (१३ जून) राज्यभर हवा छोडो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे सर्वेसर्वा नानासाहेब जावळे पाटील यांनी हा इशारा दिला असून त्यांनी म्हटले आहे कि ,मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम केले जात आहे.१३ डिसेंबर २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन महिन्याचा वेळ दिला होता. मात्र, त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुकी अगोदर आरक्षण देऊ, असेही आश्वासन दिले होते.पण काहीच झालेले नाही . आजपर्यंत आघाडी सरकारने श्वासनाशिवाय काही केले नाही आणि आमच्या पदरात काहीही दिलेले नाही. सरकारने फक्त वेळकाढूपणा केला. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून (१३ जून) राज्यभर हवा छोडो आंदोलन करण्यात येणार असल्याचे जावळे पाटील यांनी म्हटले आहे.
