
मुंबई – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दणदणीत पराभव पत्करल्याने कोकणचा गड गमविणार्या कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांनी आता राष्ट्रवादीविरोधात रागाचा सूर आळवला आहे. राष्ट्रवादीने असहकार केल्यानेच पराभव झाल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे आयोजित बैठकीनंतर बोलताना नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
असहकार … राणेंचा राष्ट्रवादीवर ठपका
लोकसभा निवडणुकांतील पराभवासाठी काँग्रेस पक्षातील नेते जबाबदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असहकारामुळे झाल्याचे सांगितले. विशेषत: कोकणात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सिंधुदूर्ग-रत्नागिरी मतदारसंघात डॉ. निलेश राणे यांचा पराभव झाल्याचा ठपका नारायण राणेंनी राष्ट्रवादीवर ठेवला आहे.
