अनेक वेळा इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड होते. पण ते का सस्पेंड करण्यात आले हे देखील तुम्हाला माहीत नसते. अशा परिस्थितीत खाते कसे रिकव्हर करायचे हे स्पष्ट होत नाही. तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाले असेल, तर ते रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामकडे अपील करावे लागेल. हा पर्याय तुम्हाला फक्त Instagram वर दर्शविला जातो. खाते सस्पेंड झाल्यावर काय करायचे ते आम्ही येथे सांगतो आणि ते किती दिवसांनी खाते रिकव्हर होते आणि तुम्ही नेहमीप्रमाणे खाते कधी वापरण्यास सक्षम व्हाल?
इन्स्टाग्रामवर निलंबित खाते कसे कराल रिकव्हर ? हा आहे सोपा मार्ग
या स्टेप्स करा फॉलो
खाते सस्पेंड झाल्यावर, तुमच्या स्क्रीनवर पडताळणी प्रक्रिया दिसते. यासाठी तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ आणि फोटो इथे सबमिट करावा लागेल. यासाठी ज्या क्रमांकाने खाते तयार केले आहे, तो क्रमांकही टाकावा लागेल. तुमच्या नंबरवर मिळालेला OTP भरा आणि Done वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक मेल येईल. तुम्हाला मेलमध्ये एक फॉर्म पाठवला जातो. पण जर तुम्हाला मेल मिळाला नसेल, तर तुम्ही तो मेल स्वतः भरू शकता. खाते पुनर्प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला 180 दिवसांच्या आत Instagram वर अपील करावे लागेल.
असे करा अपील
- अपील करण्यासाठी, तुम्हाला Instagram च्या मदत केंद्रावर जावे लागेल. मदत केंद्रावर गेल्यानंतर, “माय अकाउंट सस्पेंडेड” वर क्लिक करा ही एक फॉर्म लिंक आहे. ती उघडा आणि काळजीपूर्वक भरा.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला युजरनेम आणि ज्या प्रदेशातून तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट चुकीच्या पद्धतीने बॅन केले गेले आहे, असे तुम्हाला वाटते ते नाव द्यावे लागेल.
- हा फॉर्म काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा, या आधारावर खाते पुनर्प्राप्त केले जाऊ शकते. या फॉर्ममध्ये तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही इन्स्टाग्रामच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले नाही.
पाहा इंस्टाग्रामच्या उत्तराची वाट
एकदा अपील सबमिट केल्यानंतर, Instagram प्रतिसादाची प्रतीक्षा करा. चुकून अकाऊंट सस्पेंड झाले आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इन्स्टाग्राम ॲपद्वारेही खाते दुरुस्त करून घेऊ शकता. येथे तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड टाका आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. तुमचे खाते आणि तक्रारीचे येथूनही पुनरावलोकन केले जाऊ शकते.