
गोविंदाने कॉमेडी आणि रोमँटिक सिनेमांद्वारे लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. गेल्या काही वर्षांत तो कोणत्याही चित्रपटात दिसला नसला, तरी आजही लोक त्याचे वेडे आहेत. त्याच्यानंतर आता त्यांचा मुलगा यशवर्धन आहुजा चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. लवकरच त्याचा डेब्यू चित्रपट येणार आहे.
चित्रपटात पदापर्णासाठी गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा सज्ज, साऊथच्या दिग्दर्शकाशी हातमिळवणी
पिंकविलाच्या वृत्तानुसार, यशवर्धन आहुजा नॅशनल अवॉर्ड विजेते साऊथ डायरेक्टर साई राजेशच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही, मात्र हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट असणार आहे. एका सूत्राचा हवाला देत रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की यशवर्धनने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते आणि त्याला हा चित्रपट गुणवत्तेच्या आधारावर मिळाला आहे.
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा सध्या चित्रपटाच्या महिला कास्टिंगवर काम करत असून त्यांना देशभरातून 14 हजारांहून अधिक ऑडिशन क्लिप मिळाल्या आहेत. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री लवकरच फायनल केली जाईल, असे सांगण्यात येत आहे, कारण निर्मात्यांना पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे आहे.
एकीकडे सई राजेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे मधु मंतेना, अल्लू अरविंद आणि एसकेएन फिल्म्स संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या प्रेमकथा चित्रपटाच्या मूळ संगीतावर सई राजेश निर्मात्यांसोबत काम करत आहे. या चित्रपटाला लोकांच्या मनाला भिडणारे संगीत द्यायचे आहे.
StarsUnfolded नुसार, यशवर्धनने लंडनच्या मेट फिल्म स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपट निर्मितीची गुंतागुंत जाणून घेण्यासाठी तो साजिद नाडियाडवालाच्या टीमचा एक भागही होता. आता तो अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे.
