IND VS AUS : पावसाने ऑस्ट्रेलियाला वाचवले, गाबा कसोटी अनिर्णित


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी अनिर्णित राहिली आहे. पाचव्या दिवशी पावसामुळे जास्त खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये जोरदार पाऊस झाला आणि खराब हवामानामुळे सामना अनिर्णित राहिला. सध्या कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता पुढील सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वरचढ होता यात शंका नाही, पण चौथ्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाने अप्रतिम खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला फक्त 275 रन्सचे टार्गेट दिले होते, जे टीम इंडियाला गाठता आले असते. टीम इंडियाने मागच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर 328 धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता. अशा स्थितीत यावेळीही या धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण होते.

जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली, त्याने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याच्या नावावर 9 विकेट्स होत्या. ऑस्ट्रेलियाच्या वतीने ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात 152 धावांची खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हेडशिवाय स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात 101 धावांची खेळी केली.