WTC Scenario : टीम इंडिया आता विसरा WTC फायनल! गाबामधील पराभवानंतर अशी होईल भारताची अवस्था


बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने सुमारे 445 धावा फलकावर लावल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली आहे. ॲडलेडनंतर गाबामध्येही टीम इंडियावर पराभवाचे ढग दाटून आले आहेत. जर टीम इंडिया गाबामध्ये हरली, तर डब्ल्यूटीसी फायनल 2025 खेळण्याच्या त्याच्या आशांनाही मोठा धक्का बसेल. गाबामध्ये भारताचा पराभव झाला, तर 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाची स्थिती काय असेल आणि त्याच्या WTC फायनलसाठी काय समीकरणे असतील ते पाहूया.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत फक्त दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया उरले आहेत. सध्या दक्षिण आफ्रिका 63.33 टक्के गुणांसह अव्वल आहे. ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून टीम इंडिया 57.29 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर टीम इंडिया गाबा टेस्ट हरली, तर ती तिसऱ्या क्रमांकावर राहील पण तिचे गुण कमी होतील.

यानंतर टीम इंडियाने मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर त्याचे गुण 58.8% आणि ऑस्ट्रेलियाचे गुण 57% होतील. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर येईल. भारतीय संघाला इतर कोणत्याही संघावर अवलंबून न राहता थेट WTC फायनल 2025 मध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्याला गाबा कसोटी जिंकावी लागेल आणि त्यानंतर मालिकेतील उर्वरित दोन सामनेही जिंकावे लागतील.

जर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 किंवा 1-4 ने हरली तर ते WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. जर BGT 2-2 असा बरोबरीत राहिला तर टीम इंडियाला WTC मध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल. श्रीलंकेला मायदेशात दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश करावा लागणार आहे. याशिवाय आणखी एक समीकरण म्हणजे बीजीटीने ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील दोन्ही कसोटी सामने गमवावे लागतील, तर टीम इंडियाला संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील किमान एक सामना अनिर्णित राहिला पाहिजे.