Box Office Day 11: ‘पुष्पा 2’ ने 11व्या दिवशी भारतातून छापले 900 कोटी, पुष्पाभाऊचे पुढील लक्ष्य 2000 कोटी?


अल्लू अर्जुनची ‘वाइल्ड फायर’ स्टाईल पाहून अनेक भल्याभल्यांना घाम फुटला आहे. 11 दिवसांत ‘पुष्पा 2’ ने एवढा टप्पा पूर्ण केला आहे, जो अनेक चित्रपट 50 दिवस चालवूनही करू शकले नाहीत. या चित्रपटाने यापूर्वीच जगभरातून 1000 कोटींची कमाई केली होती. आता भारतातही 900 कोटी रुपये छापण्यात आले आहेत. दुसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कमाईने मोठी झेप घेतली आहे. 11 व्या दिवशी एकट्या भारतातून 75 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ ने 11व्या दिवशी एकूण 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ज्यामध्ये हिंदीतून 55 कोटी रुपये, तेलुगूमधून 16 कोटी रुपये आणि तामिळमधून 3 कोटी रुपये छापले आहेत. जर आपण कन्नड बद्दल बोललो, तर त्याने 0.6 कोटी रुपये आणि मल्याळमने 0.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने भारतातून एकूण 63.3 कोटींची कमाई केली होती.

‘पुष्पा 2’ चे एकूण भारतीय निव्वळ कलेक्शन 900.5 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने हिंदीतून सर्वाधिक कलेक्शन केले आहे. 553.1 कोटींची कमाई एकट्या हिंदीतून झाली आहे. तर तेलगूमधून 279.35 कोटी रुपये छापले आहेत. याशिवाय तामिळमधून 48.1 कोटी रुपये, कन्नडमधून 6.55 कोटी रुपये आणि मल्याळममधून 13.4 कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, या चित्रपटाने जगभरातून 1292 कोटींची कमाई केली आहे. आता पुष्पाभाऊंची नजर 2000 कोटींवर असेल.

11व्या दिवशी ‘पुष्पा 2’ ने हिंदीतून 55 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासोबतच हा हिंदीतील दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुष्पा भाऊंनी 11व्या दिवशी 42.4 कोटींची कमाई करणाऱ्या ‘स्त्री 2’ चा रेकॉर्ड मोडला आहे. या यादीत जवान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 34.26 कोटींची कमाई केली होती. यशचा KGF 2, प्रभासचा कल्की 2898 AD आणि दीपिका पादुकोणचा पद्मावत देखील मागे राहिला आहे.