
आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट असे उगाच म्हटले जात नाही. तो कुठलाही चित्रपट करतो, त्यात तो मनापासून झोकून काम करतो. यामुळेच चाहत्यांचे अभिनेत्यावर खूप प्रेम आहे. आमिरच्या बहुतेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली, तरी 1998 मध्ये रिलीज झालेला ‘गुलाम’ही चांगलाच गाजला होता. आमिर खान आणि राणी मुखर्जी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकतो. हा चित्रपट करण्यासाठी आमिरने आपला जीव धोक्यात घातला होता.
एका छोट्याशा चुकीमुळे गेला असता आमिर खानचा जीव, त्याने केले असे काम, ज्यामुळे सगळ्यांच्या जीव लागला होता टांगणीला
‘गुलाम’ केवळ आमिर खान आणि राणी मुखर्जी यांच्या अभिनयामुळेच चालला नाही, तर आमिर खानने या चित्रपटात बोललेल्या टपोरी भाषेमुळेही तो त्यावेळी खूप पसंत गेला होता, असे म्हटले जाते. चित्रपटातील आती क्या खंडाला हे गाणे आजही ऐकायला मिळते. आमिर खान ज्या स्टाईलमध्ये टपोरी भाषेत डायलॉग बोलला होता, तो खूप प्रसिद्ध झाला होता.

असं म्हटले जाते की, त्यावेळी आमिर खानच्या ‘गुलाम’ची क्रेझ लोकांच्या मनावर इतकी होती की, मुले आमिरच्या स्टाईलमध्ये त्यांच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करायचे. या चित्रपटासाठी आमिर खानने खूप मेहनत घेतली होती. ‘गुलाम’ बद्दल एक किस्सा आहे की चित्रपटाच्या एका दृश्यात अभिनेत्याचा जीव जवळजवळ धोक्यात घातला होता. खरं तर झाले असे की, आमिर खानला ‘गुलाम’मध्ये ट्रेनचा सीन करायचा होता. हा सीन छान दिसण्यासाठी आमिर खानने कोणत्याही स्टंटमॅनला किंवा बॉडी डबलची नियुक्ती न करता तो स्वतःच करण्याचा निर्णय घेतला होता.
वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, रेल्वेच्या सीनच्या शूटिंगसाठी भारतीय रेल्वेकडून परवानगी घ्यावी लागली, त्यानंतर हा सीन सानपाडा रेल्वे स्टेशनवर शूट करण्यात आला. जर तुम्ही ‘गुलाम’ चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला आठवत असेल की आमिर खान झेंडा घेऊन चालत्या ट्रेनसमोर उडी मारतो. झेंडा घेऊन ट्रेनसमोर धावायचे आणि ट्रेन जवळ येताच शेजारच्या रुळांवरून उडी मारायची हेच दृश्य. पण हा सीन करत असताना आमिर खान ट्रेनच्या इतका जवळ गेला होता की त्याच्या आणि मृत्यूमध्ये थोडेच अंतर उरले होते आणि आमिर खान थोडक्यात बचावला होता.
