ॲडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि या मॅचमध्ये मोहम्मद सिराजही चर्चेत आला. वास्तविक, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराज खूपच आक्रमक झाला आणि अनेकांना याचे वाईट वाटले. विशेषत: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू यामुळे चांगलेच संतापले असून आता ते टीम इंडियाला सिराजला शांत ठेवण्याचा सल्ला देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने, तर टीम इंडियाने सिराजशी बोलले पाहिजे, कारण तो अंपायरच्या निर्णयापूर्वीच सेलिब्रेशन करायला लागतो. टेलरने नेमके काय म्हटलेय ते जाणून घेऊया?
वाईट वाटते… टीम इंडिया मोहम्मद सिराजच्या या कृतीवर घालणार बंदी?
मार्क टेलरने नाईन न्यूजला सांगितले की, जोपर्यंत मोहम्मद सिराजचा संबंध आहे, मला त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्याच्याशी बोलायला आवडेल. त्याच्याशी बोलले पाहिजे, हेडसोबत घडलेल्या प्रकाराबद्दल नाही, तर त्याबद्दल बोलले पाहिजे की जेव्हा त्याला वाटते की त्याने फलंदाजाला बाद केले, तेव्हा तो पंचाचा निर्णय पाहण्यासाठी वळत नाही आणि आनंद साजरा करण्यास सुरुवात करतो. मला वाटते की हे त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी हे चांगले नाही. टेलर पुढे म्हणाला की त्याला सिराजचा उत्साह आवडतो, त्याला सामन्यात राहणे आवडते, परंतु खेळाचा आदर राखण्याची गरज आहे. टेलरच्या मते, वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी त्याला समजावून सांगितले, तर त्याला गोष्टी कळतील.
मोहम्मद सिराजसाठी दुसरी कसोटी चांगली ठरली नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली, पण हेडसोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. या खेळाडूच्या मॅच फीमध्ये 20 टक्के कपात करण्यात आली आहे. बीसीसीआय प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये देते, त्यापैकी सिराजला आता आयसीसीला 3 लाख रुपये द्यावे लागतील. या धक्क्यानंतर सिराज तिसऱ्या कसोटीत कसा पुनरागमन करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळवली जाणार आहे.