IRCTC वेबसाइट ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येत नव्हते. तसेच प्रवाशांचे हाल झाले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच IRCTC साइट ठप्प झाली. IRCTC ने एक निवेदन जारी केले की साइटवर देखभालीचे काम सुरू आहे, त्यामुळे 1 ते 4 तासांच्या दरम्यान कोणतेही बुकिंग केले जात नाही. वेबसाइट सेवा सुरू करण्यासाठी आयआरसीटीसीने एक तासाचा वेळ मागितला होता, पण त्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. आता लोक सहज तिकीट बुक करू शकतात.
4 तास डाऊन राहिल्यानंतर सुरु झाली IRCTCची वेबसाइट, तुम्ही आता बुक करू शकता तिकीट
आयआरसीटीसी सेवा बंद झाल्यानंतर, तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. IRCTC टॅग करून लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.
असे सांगितले जात आहे की IRCTC चे वेबसाइट मेन्टेनन्सचे काम 11 वाजल्यानंतर केले जाते, पण आज ते त्याच्या आधी केले गेले. अशा परिस्थितीत लोक सायबर हल्ल्याबद्दल बोलत आहेत. कारण एसी तत्काळसाठी तिकीट बुकिंग 10 वाजल्यापासून सुरू होते, तर नॉन-एसी तिकीट बुकिंग 11 वाजल्यापासून सुरू होते. आयआरसीटीसी सेवा बंद असल्याने दोन्हीचे बुकिंग शक्य नव्हते. प्रवासी चिंतेत होते. एक्स वर त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या.