पुष्पा झुकेगा नहीं…पण मन वळवणार हे नक्की. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड उद्ध्वस्त केले आहेत. ‘पुष्पा 2’च्या झंझावातापुढे ऑस्कर विजेत्या चित्रपट आरआरआरनेही शरणागती पत्करली आहे. सगळीकडे फक्त ‘पुष्पा 2’ चे नाव ऐकू येत आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात जे काही इतर चित्रपट करू शकले नाही, ते या चित्रपटाने केले आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जगभरात आपली छाप पाडली आहे. याने पहिल्याच दिवशी जगभरात 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
WW Box Office Collection Day 1 : ‘पुष्पा 2’ ने तोडले मोठे रेकॉर्ड, जगभरात कमावला 282 कोटींचा गल्ला
‘पुष्पा 2’ रिलीज होण्याआधी सगळ्यांचे लक्ष फक्त RRR, कल्की, जवान, पठाण या सिनेमांचे पहिल्या दिवसाचे कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढणार का याकडे होते. तर आता उत्तर ऐका! होय, ‘पुष्पा 2’ ने साऊथपासून बॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांचे पहिल्याच दिवशी कमाईचे रेकॉर्ड उद्ध्वस्त केले आहे. एका रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ ने जगभरात रिलीजच्या पहिल्या दिवशी 282.91 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई केली आहे.
हे आकडे ऐकल्यानंतर अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अल्लू अर्जुनच्या घरी दिवाळीचे वातावरण आहे, तिथे खूप फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘पुष्पा 2’च्या रेकॉर्डब्रेक कमाईचा आनंद सर्वजण साजरा करत आहेत. मनोबाला विजयबालन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘पुष्पा 2’ ने इतिहास रचला आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला मागे टाकत, तो जगभरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय सलामीवीर ठरला आहे.
‘पुष्पा 2’ चे जगभरातील कलेक्शन
- आंध्र प्रदेश – 92.36 कोटी
- तामिळनाडू – 10.71 कोटी
- कर्नाटक – 17.89 कोटी
- केरळ – 6.56 कोटी
- नॉर्थ – 87.24 कोटी
- ओव्हरसीज – 68.15 कोटी
- एकूण कमाई – 282.91 कोटी
पुष्पा 2 ने पहिल्याच दिवशी मोडले हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व विक्रम
- पुष्पा 2 : 68 कोटी रुपये
- जवान : 65.5 कोटी
- स्त्री 2 : 55.40 कोटी
- पठाण : 55 कोटी
- अॅनिमल : 54.75 कोटी