रोहित-पंतसोबत घाणेरडे कृत्य, विराट-गिललाही सोडले नाही, ॲडलेडमध्ये दिवसाढवळ्या टीम इंडियाशी गैरवर्तन


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ॲडलेडमध्ये होणार आहे. 6 डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे नुकतेच ॲडलेडमध्ये खुले सराव सत्र झाले. पण आता चाहत्यांना भारतीय संघाच्या सराव सत्राला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने हा निर्णय का घेतला, असा धक्कादायक खुलासा समोर आला असून, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उर्वरित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने बंद दरवाजाआड सराव सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, खुल्या सराव सत्रादरम्यान भारतीय खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक खेळाडूंवर अश्लील कमेंटही करण्यात आल्या. त्याचवेळी काही खेळाडूंना चाहत्यांनी घेरले. त्यानंतर बीसीसीआयने चाहत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मंगळवारी खुले सराव सत्र देखील केले होते. पण त्यांच्या खुल्या सराव सत्रात 70 पेक्षा जास्त लोक आले नाहीत, तर दुसरीकडे टीम इंडियाच्या सराव सत्रात जवळपास 3000 लोक उपस्थित होते, ज्याची कोणाला अपेक्षाही नव्हती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘हा संपूर्ण गोंधळ होता. ऑस्ट्रेलियन सत्रादरम्यान 70 पेक्षा जास्त लोक नव्हते, परंतु भारतीय सराव सत्रात सुमारे 3000 लोक पोहोचले, इतक्या लोकांची अपेक्षा कोणीही केली नव्हती. सिडनी कसोटी सामन्यापूर्वी खुले सराव सत्र होणार होते, जो मालिकेतील शेवटचा सामना असेल, परंतु आता ते रद्द करण्यात आले आहे. कारण इथे केलेल्या असभ्य आणि असंवेदनशील कमेंटमुळे खेळाडू खूप दुखावले जातात.

दुसरीकडे, मैदानात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, चाहत्यांनी रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंना षटकार मारण्यासाठी प्रवृत्त केले. काही चाहत्यांनी रोहित-पंतच्या फिटनेसवर असभ्य कमेंट्स केल्या आणि बॉडी शेमिंग केली. दुसरीकडे विराट कोहली आणि शुभमन गिलला जवळपास गर्दीने घेरले होते. काही लोक त्यांच्या मित्रांसोबत फेसबुक लाईव्ह करत होते आणि फलंदाज खेळत असताना जोरात बोलत होते. त्याचवेळी एक चाहता एका खेळाडूला गुजरातीमध्ये हाय म्हणण्याची विनंती करत होता. या सर्व घटना पाहता बीसीसीआयने आता चाहत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.